आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्ह्यात 63 ठिकाणी पोलिसांचे छापे:3 लाखांची दारु जप्त, ड्रंक ॲण्ड ड्राईव्हप्रकरणी 38 चालकावर गुन्हे दाखल

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरासह जिल्हाभरात धुलीवंदनाच्या पार्श्वभुमीवर बेकायदेशीर दारु विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी ६३ ठिकाणी छापे टाकून तब्बल ३ लाख रुपये किंमतीची दारु जप्त केली आहे. तर दारु पिऊन वाहना चालविणाऱ्या ३८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धुलीवंदनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हयातील सर्व १३ पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते. यामध्ये वाहनांची तपासणी करावी, बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकावेत, दारु पिऊन वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिले होते. तसेच संवेदनशील ठिकाणी गस्त ठेवण्याच्या सुचनाही दिल्या होत्या.

त्यानुसार जिल्हाभरात पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ पोलिस ठाण्यांतर्गत १३ पथके स्थापन करण्यात आली होती. या शिवाय गुन्हे शाखेचे पथकही तैनात केले होते.

या पथकाने दोन दिवसांत ६३ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये सुमारे ४०० लिटर दारु जप्त करण्यात आली असून यामध्ये देशी, विदेशी दारुसह, गावठी दारुचा समावेश आहे. या दारुची किंमत सुमा्ो ३ लाख रुपये आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या शिवाय ३८ जण दारु पिऊन वाहने चालवित असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनीक शांततेचा भंग करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...