आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया व युक्रेन या देशात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थी किंवा नागरीक अडकले असल्यास त्यांच्या माहितीसाठी मराठवाड्यातील जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरीकांनी या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त कार्यालयाने केले आहे.
रशिया व युक्रेन या देशात युध्दजन्य परिस्थिती आहे. युक्रेन देशात भारतीय नागरीक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नागरीकांच्या मदतीसाठी दिल्ली येथे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने मदत केंद्र सुरु केले आहे. याच धर्तीवर मराठवाड्यातील विद्यार्थी किंवा नागरीक तेथे असल्यास मराठवाड्यातील त्यांच्या नातेवाईकांसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.
त्यानुसार मराठवाड्यात जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी नागरीकांनी ०२४०-२३३१०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. जालनासाठी ०२४८२-२२३१३२, परभणी ०२४५२-२२६४००, हिंगोली ९५५२९३२९८१, नांदेड ०२४६२-२३५०७७, बीड ०२४४२-२२२६०४, लातुर ०२३८२-२२०२०४ किंवा २२३००२ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरीकांनी ०२४७२-२२५६१८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या शिवाय विभागीय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी ०२४०-२३४३१६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सोबतच औरंगाबाद येथे अजय चौधरी, जालना दिपक काजळकर, परभणी पवन खांडके, हिंगोली रोहित कंजे, नांदेड किशोर कुऱ्हे, बीड जोशी, लातुर साकेब उस्मानीया, उस्मानाबाद वृषाली तेलोरे या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या नियंत्रण कक्षामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी व नागरीकांच्या बाबतीत त्यांच्या नातेवाईकांना माहिती किंवा मदत मिळणे शक्य होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.