आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1200 वर्षाआधीची भगवान कुंथुनाथाची मूर्ती सापडली:औंढा नागनाथ येथील जैन मंदिराच्या बांधकामात पाया खोदाताना प्रकार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथील जैन मंदिराच्या बांधकामामध्ये पायाचे खोदाकाम करीत असतांना 24 तिर्थंकरापैकी एक असलेल्या कुंथूनाथ भगवान यांची दगडाची मूर्ती सापडली असून सदर मूर्ती सुुमारे 1200 वर्षापुर्वीची असावी असा अंदाज आहे. जैन मूनींच्या मार्गदर्शनानंतरच यामूर्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे तेजकुमार झांझरी यांनी सांगितले.

औंढ्यात 1700 वर्षापुर्वीचे दिगंबर जैन मंदिर

याबाबत झांझरी यांनी सांगितले की, औंढा नागनाथ येथे सुमारे 1700 वर्षापुर्वीचे दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरात 24 तिर्थंकरासोबतच पार्श्वनाथ भगवान, आदिनाथ भगवान यांच्या मूर्त्या आहेत. सध्या या मंदिराच्या परिसरात बांधकाम केले जाणार असून या कामाचे भुमीपूजन करून (ता. 26) जानेवारी पासून प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली आहे. 1500 स्क्वेअर फुट आकाराच्या या मंदिराचे बांधकाम होत असून या ठिकाणी मानस स्तंभ उभारला जाणार आहे.

सात फुट खोलीवर सापडली मूर्ती

मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पायाच्या खोदकामामध्ये मंगळवारी सुमारे पाच ते सात फुट खोलीवर एक दगड आढळून आला. त्यामूळे अत्यंत सावकाशपणे या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर या ठिकाणी मूर्ती आढळून आली. सदर मूर्ती बाहेर काढून त्यावरील माती हटविल्यानंतर सदर मूर्ती चोविस तिर्थंकरापैकी एक असलेल्या कुंथूनाथ भगवान यांची असल्याचे स्पष्ट झाले. मूर्ती पूर्णपणे दगडाची असून उंची सव्वापाच फुटाची आहे. सुमारे 1200 वर्षापुर्वीची हि मूर्ती असावी असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. मूर्ती सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

जैन मूनींच्या आज्ञेनुसार निर्णय

दरम्यान, औंढा येथे मंदिराच्या परिसरात मूर्ती सापडल्याची माहिती आचार्य विभवसागर महाराज, आचार्य विशेष सागर महाराज यांच्यासह जैनमूनींना दिली जाणार असून त्यांच्या आज्ञेनुसारच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे झांझरी यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...