आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Hingoli News | Marathi News | Crime | A Place For Making Native Liquor From Spirits Was Demolished In Jamdaya Shivara; Performance Of The Local Crime Branch

स्पिरिटपासून देशी दारू:जामदया शिवारात स्पिरिटपासून देशी दारू बनविण्याचा अड्डा उध्वस्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात एका आखाड्यावर स्पिरिटपासून देशी दारू तयार करण्याचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केला असून पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ११ रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. भगवान नामदेव शेळके (रा. जामदया ) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात भगवान नामदेव शेळके याच्या आखाड्यावर स्पिरिट पासून बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे जमादार बालाजी बोके,भगवान आडे, संभाजी लकुळे, राजू ठाकूर, किशोर सावंत, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे, शेख जावेद, महिला पोलिस कर्मचारी पारू कुडमेथे यांच्या पथकाने शुक्रवारी ता. ११ सायंकाळी छापा टाकला. मात्र पोलिस येत असल्याचे लक्षात येताच भगवान शेळके यांने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी तीन टाक्या रसायन व स्पिरिट तसेच तयार केलेली बनावट देशी दारू भरण्यासाठी देशी दारूचे लेबल असलेल्या १५५ रिकाम्या बाटल्या, १३००० झाकण, देशी दारू भरलेल्या ५८ बाटल्या असा ९६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी जमादार भगवान आडे यांच्या तक्रारीवरून औंढानागनाथ पोलिस ठाण्यात भगवान शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...