आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील येलकी येथे सशस्त्र सीमा बलात मागील ९ महिन्यापासून खडतर प्रशिक्षण घेणाऱ्या २४५ जवानांचा दीक्षांत सोहळा शनिवारी ता.३ पार पडला. हर्ष ध्वनीच्या वेळी जवानांनी दिलेल्या भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि उपस्थितांच्या अंगावर रोमांच उठले.
कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे सशस्त्र सीमा बलाचे मुख्यालय आहे. या ठिकाणी मागील ९ महिन्यापासून देशातील विविध भागातून बलात नव्याने भरती झालेल्या जवानांनां प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये युद्धकौशल्य कला, हत्यार चालवणे, नकाशा वाचन तसेच शारीरिक क्षमता यासह विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
आज सकाळी शस्त्र सीमा बल येथे दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी सशस्त्र सीमा बलाचे उपमहानिरीक्षक सेरिंग दोर्जे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, मुदखेडच्या केंद्रीय राखीव दलाचे समादेशक लीलाधर महारानिया, हिंगोलीच्या राज्य राखीव दलाचे समादेशक संदीपसिंग गिल, येलकीच्या सशस्त्र सीमा बलाचे समादेशक विनयकुमार सिंह यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रशिक्षित जवानांनी कवायत सादर केली. त्यानंतर या जवानांना देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची शपथ देण्यात आली. त्यानंतर हर्ष ध्वनी करण्यात आला. यावेळी जवानांनी भारत माता की जय घोषणा दिल्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या सोहळ्यानंतर आता या जवानांना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पदस्थापने नुसार देशाच्या विविध भागांमध्ये रवाना केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सहाय्यक समादेशक अंजनीकुमार तिवारी, समादेशक सहाय्यक पंकज साहा, मेडिकल विभागाचे सहायक समादेशक डॉ. बी. विष्णू प्रियांका, निरीक्षक सिकंदर कुमार, निरीक्षक हराराम, निरीक्षक शशिकुमार यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
सर्वोत्कृष्ट जवान पुरस्कार जवान राजेंद्र परमार यांनी पटकावला
उत्कृष्ट इन डोअर प्रशिक्षण पुरस्कार जवान चंदन मुरारी, उत्कृष्ट फायरींग पुरस्कार श्रीधर नायक, उत्कृष्ट प्रॉमिसिंग टॅलेंट पुरस्कार ताकतसिंग यादव, उत्कृष्ट आऊट डोअर प्रशिक्षण पुरस्कार सुभाषचंद्र दलाई, उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार अनु विजयकुमार, उत्कृष्ट कवायत पुरस्कार जय गोपाल यांना देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.