आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात:हिंगोली पोलिस मुख्यालयाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पोलिस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. बुधवारी ता. 24 रात्री उशीरा मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषीक वितरण झाले.

येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर या स्पर्धा झाल्या. यावेळी पोलिस मुख्यालय, उपविभाग हिंगोली शहर, उपविभाग वसमत, उपविभाग हिंगोली ग्रामीण या उपविभागातील 95 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुरुष गटात 100 मिटर धावणे प्रथम आशीष बडगे, द्वितीय राम दळवे, गोळाफेक प्रथम कुंडकर, द्वितीय रामदिनवार, थाळीफेक प्रथम अतुल बोरकर, द्वितीय गायकवाड, भालाफेक प्रथम गजानन डुरे, द्वितीय अतुल बोरकर, व्हॉलीबॉल प्रथम पोलिस मुख्यालय, द्वितीय उपविभाग हिंगोली शहर, फुटबॉल प्रथम पोलिस मुख्यालय, द्वितीय उपविभाग वसमत यांनी यश मिळविले.

महिलांच्या गटात 100 मिटर धावणे प्रथम संध्या आगासे, द्वितीय विजया ठेंगडे, गोळाफेक प्रथम संध्या आगासे, द्वितीय चव्हाण, थाळीफेक व भालाफेक स्पर्धेत प्रथम चव्हाण, द्वितीय संध्या आगासे यांनी यश मिळविले. व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम ग्रामीण उपविभाग, द्वितीय वसमत उपविभाग यांनी यश मिळविले आहे.

या स्पर्धेचे पारितोषीक वितरण बुधवारी ता. 24 रात्री उशीरा झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, राखीव दलाचे समादेश संदीपसिंह गिल, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वागवाड, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले तर अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...