आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली पोलिस भरती प्रक्रिया:972 पैकी 147 उमेदवार अपात्र ;आता लेखी परिक्षेची तयारी सुरू

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेमध्ये मागील तीन दिवसांत उपस्थित असलेल्या 972 पैकी 147 उमेदवार अपात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर आता लेखी परिक्षेची तयारी सुरु करण्यात आली आहे. शासनाच्या सुचनेनंतर एकाच वेळी लेखी परिक्षा घेतल जाणार आहे.

येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भरती प्रक्रिया ता. 2 जानेवारी पासून सुुुरु करण्यात आली आहेत. यामध्ये 21 जागेसाठी 1435 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ता. 2 जानेवारी रोजी 440 तर ता. 3 जानेवारी रोजी 418 तर ता. 4 जानेवारी रोजी 114 असे एकूण 972 उमेदवार भरती प्रक्रियेसाठी आले होते.

या उमेदवारांची शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात आली असून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 147 उमेदवार अपात्र ठरले आहेत. तर उर्वरीत पात्र उमेदावरांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. सोमवारी ता. 4 भरतीसाठी 112 महिला उमेदवार तर 2 माजी सैनीक भरतीसाठी दाखल झाले होते. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात आली आहे.

दरम्यान, भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी सर्व चाचण्यांचे उमेदवारनिहाय छायाचित्रीकरण केले जात आहे. या शिवाय उमेदवारांच्या अडचणी व त्यांना आवश्‍यक ती माहिती मैदानावरच देऊन त्यांचे समाधान केले जात आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले पोलिस कर्मचाऱ्यांनाच मैदानावर उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शारिरीक व मैदानी चाचणी झाल्यानंतर आता राज्यात एकाच वेळी लेखी परिक्षा घेतली जाणार असून याबाबत सुचना प्राप्त झाल्यानंतर तातडीने लेखी परिक्षा घेतली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...