आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्हा पोलिस दलातील 21 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी सोबतच शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी 25 अधिकारी व सुमारे 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान आज सकाळी सात वाजल्यापासून उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या ठिकाणी हजेरी लावली होती. आज सकाळी दहा वाजेपर्यंत 647 उमेदवारांपैकी 430 उमेदवार हजर झाले होते. या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये 100 मीटर धावणे 1600 मीटर धावणे व गोळा फेक या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना मंगळवारी ता. 3 बोलवण्यात आले आहे.
दरम्यान उमेदवारांसाठी भरती मैदानावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथकही तैनात करण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रवेश पत्र देण्यात आले असून प्रत्येक वेळी प्रवेश पत्र दाखविण्याची मागणी केल्यास उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश पत्र दाखवावे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार असून उमेदवारांनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.