आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विनोद देशमुख यांनी प्रशिक्षण कालावधीत चांगली कामगिरी केली असून, त्यांनी लेखी परीक्षेत दुसरा क्रमांक तर इतर स्पर्धामध्येही तीन पुरस्कार पटकावले आहे.
पोलिसांची कामगिरी
हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेले विनोद भाऊसाहेब देशमुख यांची खात्यांतर्गत परीक्षेनंतर पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. राज्यभरातील 171 उमेदवारांचे प्रशिक्षण नाशीक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीमध्ये 2 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाले होते. नुकताच या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला आहे.
पटकावली 3 पारितोषिके
प्रशिक्षण कालावधीनंतर घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत उपनिरीक्षक देशमुख यांनी दुसरा क्रमांक पटकावला. तर ऑल राऊंड म्हणून तिसरा क्रमांक मिळवला. या प्रशिक्षण कालावधीत झालेल्या स्पर्धांमधून त्यांनी तीन पारितोषिके पटकावली. त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र पोलिस अकॅडमीचे संचालक राजेशकुमार मोर, उपसंचालक गौरवसिंग, पोलिस अधीक्षक एन. अंबिका यांच्या हस्ते चषक देऊन सत्कार करण्यात आला. हिंगोली पोलिस दलातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.