आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:जालना ते छपरा, मुंबईच्या रेल्वेसाठी हिंगोलीत आंदोलन, राज्यमंत्री रावसाहेब दानवेेंचे चर्चेसाठी निमंत्रण

हिंगोली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना-छपरा रेल्वेसह मुंबईसाठी नवीन रेल्वे मिळण्यासाठी मागणीसाठी हिंगोलीत रेल्वे संघर्ष समितीने बुधवारी (२३ नोव्हेंबर) केलेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी रेल्वे रोखल्यानंतर प्रशासन नरमले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आंदोलकांना मुंबईला भेटण्यासाठी येण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे नवीन गाड्यांची मागणी पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या. जालना ते छपरा ही रेल्वे हिंगोलीमार्गे साेडावी, हिंगोली रेल्वेमार्गावरून नवीन रेल्वेगाड्या सोडाव्यात यासाठी रेल्वे संघर्ष समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यासाठी रेल्वे विभागाकडे निवेदन देऊन २३ रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाला व्यापारी संघटना, वकील संघटनांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता.

व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद या आंदोलनात सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांनी केले होते. त्यानुसार सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. यापुढेही रेल्वे संघर्ष समितीला व्यापाऱ्यांचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे नेनवाणी यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...