आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत गावठी कट्यासह दोन जिवंत काडतूस:बाळगणाऱ्या वसमतच्या तरुणास बोल्डावाडी शिवारात पोलिसांकडून अटक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेलया एका व्यक्तीच्या तपासणीमध्ये 1 गावठी पिस्टल व दोन राऊंड, एक लोखंडी खंजीर जप्त केले आहे. या प्रकरणी वसमत येथील कैलास रमेश शिंदे (32) याच्यावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 2 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

हिंगोली जिल्हयात रात्रीच्या वेळी धावणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हयातील तेरा पोलिस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त केले आहे. रात्री आकरा वाजल्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत जिल्हयातील मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, स्थानिक गुुन्हे शाखेेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, जमादार सुनील अंभोरे, भगवान आडे, संभाजी लकुळे, किशोर आडे यांच्यासह पथक गुरुवारी ता. १ सायंकाळपासूनच गस्तीवर होते. या पथकाने कुरुंदा ते बोल्डा मार्गावर बोल्डावाडी शिवारात एका स्विफ्ट डिझायर कारला (क्र.एमएच-13-एझेड-7161) थांबविले. यावेळी कारमधील कैलास शिंदे (रा. कौठा रोड वसमत) याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली.

या प्रकारामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कारची तपासणी सुरु केली. यावेळी कारमध्ये एक लोखंडी खंजीर आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कैलासची झडती घेतली असता त्याच्या जवळ एक गावठी पिस्टल व सहा एमएमचे दोन राऊंड जप्त केले आहे. या शिवाय पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास शिंदे याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आज पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार मधुकर नागरे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...