आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानडुकराच्या हल्ला:पानकनेरगाव येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलवले

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथे बुधवारी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराने अचानक हल्ला केला यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दीपक ओंकारआप्पा अकमार असे शेतकऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील दीपक अकमार हे बुधवारी ता. ६ सकाळी नऊ वाजता शेतात जात होते. गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर एका शेतातून आलेल्या रानडुकराने दीपक यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये रानडुकरांनी त्यांच्या पायाला चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दीपक घाबरून गेले त्यांनी मदतीसाठी शेतकऱ्यांना आवाज दिला.आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी येऊन आरडा ओरड केल्यानंतर रानडुकर पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिपक यांना नांदेड येथे उपारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान सेनगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. कळपाने राहणाऱ्या रानडुकराच्या भीतीमुळे शेतकरी देखील एकट्याने शेतात जाणे टाळत आहेत. तसेच मजूर देखील कामाला येत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वन विभागाने रानडुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...