आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Hingoli Young Farmer Suicide | Marathi News | Young Farmer Commits Suicide By Hanging Himself In A Field At Mhalsapur; The Marriage Took Place 11 Months Ago

धक्कादायक!:लग्नाच्या 11 महिन्यानंतर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, गळफास घेत संपवले जीवन; अर्ध्यावरच राहिला संसार

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर येथे तरुण शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २१ घडली आहे. किशन अशोक माळेकर (२७) असे या शेतकऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर शिवारात किशन माळेकर यांचे सुमारे सहा ते सात एकर शेत आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुसऱ्या शेतात जाऊ येतो असे सांगून शेतात गेले होते. मात्र साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने सेनगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली.

पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, जमादार राठोड, राजू जाधव, अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत किशन माळेकर यांच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. तर ११ महिन्यापुर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

बातम्या आणखी आहेत...