आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:हिंगोली रेल्वेस्थानकाजवळ तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, जिंतूरहून अकोल्याला जात होता

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील रेल्वेस्थानका जवळ खांबाला एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ता. २ सकाळी उघडकीस आली आहे. विशाल धारणे (२५, रा. ढऊळगाव, ता. वसमत) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील रेल्वेस्थानकाजवळ एका तरुणाचा मृतदेह खांबाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या बाजूला एक बॅग ठेवलेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोनाजी आम्ले, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, रेल्वे पोलिस विभागाचे विश्‍वांभर शिंदे, सुनील घुगे, अंकुश बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात नेण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह विशाल धारणे याचा असल्याचे स्पष्ट झाले. मागील वर्षीच त्याचा विवाह झाला होता. जिंतूर येथील एका फायनांन्स कंपनीत तो कामाला होता. त्याची अकोल येथे बदली झाली होती. सोमवारी जिंतूर येथून तो अकोला येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यानंतर त्याने हिंगोली येथे गळफास घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती.