आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारने पाठीमागून धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू‎:भरतीसाठी धावण्याचा‎ सराव करताना धडक‎

हिंगाेली‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोंढी फाटा ते औंढा मार्गावर पोलिस‎ भरतीसाठी धावण्याचा सराव‎ करणाऱ्या तरुणीला कारने पाठीमागून‎धडक दिली. या‎अपघातात तरुणी‎१० ते १२ फूट उंच‎उडून खाली‎पडली अन् तिच्या‎डोक्याला गंभीर‎दुखापत‎झाल्याने‎ तिचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी‎ (२ मार्च) सकाळी ६ वाजता घडली.‎ कन्याकुमारी कृष्णा भोसले (१९,‎ आंबा, ता. वसमत) असे तरुणीचे‎ नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎ वसमत तालुक्यातील आंबा येथील‎ कन्याकुमारी व तिच्या दोन मैत्रिणी‎ चोंढी फाटा ते औंढा मार्गावर‎ धावण्याचा सराव करत होत्या. या‎ वेळी दोन मैत्रिणी पुढे धावत होत्या,‎ तर कन्याकुमारी मागे होती.

या वेळी‎ एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून‎ भरधाव येणाऱ्या कारने‎ कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.‎ या धडकेमुळे ती सुमारे १० ते १२ फूट‎ उंच उडाली अन् रस्त्यावर‎ कोसळली. या अपघातानंतर‎ कारचालकाने कार थांबवून तिला‎ पाहिले, मात्र तिच्या डोक्याला गंभीर‎ दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचे‎ लक्षात आल्यानंतर त्याने कारसह‎ पलायन केले. हा प्रकार परिसरातील‎ आखाड्यावर असलेल्या एका‎ शेतकऱ्याने पाहिला.

त्याने तातडीने‎ घटनास्थळी धाव घेतली तर समोर‎ धावणाऱ्या मैत्रिणींना जोरात‎ ओरडल्याचा आवाज आल्यामुळे‎ त्यांनी मागे पाहिले असता‎ कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली‎ दिसून अाली. या घटनेची माहिती‎ मिळाल्यानंतर परिसरातील‎ गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी‎ धाव घेतली. तसेच कुरुंदा पोलिस‎ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक‎ गजानन मोरे, जमादार बालाजी‎ जोगदंड, विनायक जानकर,‎ ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांनी घटनास्थळी‎ धाव घेतली.‎

बातम्या आणखी आहेत...