आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जल जीवन’मधून योजना मंजुरीसाठी कार्यवाहीच्या सूचना:लक्ष्मणनाईक तांडा येथे पाणी मिळण्याची आशा

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे जल जीवन मिशनमधून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला दिल्या. त्यामुळे या गावाला आता नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा व संघानाईक तांडा या ठिकाणी सर्वप्रथम पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या गावांना डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच टंचाई उपाययोजना हाती घ्याव्या लागतात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर गावांमधून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या असताना या टंचाईग्रस्त गावालाच वगळण्यात आले होते. या ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी सरपंच ज्योती रवींद्र पवार यांनी केली होती. या संदर्भात मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नुकतेच पत्र पाठवले आहे.