आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत भरधाव बस-दुचाकीचा भीषण अपघात:एक जण ठार तर एक जखमी; जांभळी फाट्यावरील घटना

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जांभरून आंध ते भोसी मार्गावर जांभळीफाट्या जवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. 2 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मारोती खोबराजी जुमडे (रा. जांभरूनआंध) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभरून आंध येथील मारोती जुमडे व त्यांचे मित्र सुरज प्रकाश जुमडे हे दोघे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर जांभरून आंध येथून भोसी येथे मासे आणण्यासाठी निघालेे होते. त्यांचे दुचाकी वाहन जांभळीपाटी जवळ आला असतांना हिंगोली येथून खिल्लार कडे जाणाऱ्या बसने (क्र.एमएमच-20-बीएल-1108) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात मारोती जुमडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुरज जुमडे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे, जमादार बापुराव चव्हाण, वाढवे, चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी सुरज यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. या अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणीऔंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...