आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:औंढा नागनाथ येथे स्वस्त धान्य दुकानाचा शंभर पोती गहू, 25 पोती तांदूळ पकडला

हिंगोली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एका पिकअप व्हॅन व आयशर टेम्पोतून शंभर पोती गहू व २५ पोते तांदूळ स्वस्त धान्याच्या संशयावरून पकडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी (१९♦ जून) सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारसमोर आज सकाळी दोन वाहने उभी करण्यात आली होती. या वाहनांमधून स्वस्त धान्याचा तांदूळ व गहू असल्याची माहिती औंढा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अफसर अली, जमादार संदीप टाक यांच्या पथकाने चालकाकडे विचारणा केली असता त्याला गहू व तांदूळ याबाबत माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी हे धान्य स्वस्त धान्य दुकानाचे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन औढा पोलिस ठाण्यात आणून उभी केली. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता आयशर वाहनांमध्ये १०० पोती गहू व पिकअप व्हॅनमध्ये २५ पोती तांदूळ आढळून आला. पोलिसांनी वाहन व धान्य असा सुमारे ११ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक अफसर अली यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी मोहंमद खाजा मोहंमद अफजल, शेख वसीम शेख सलीम, शेख अजमत, शेख आहत शेख समद यांच्यासह अन्य दोघांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...