आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण:हिंगोलीत तरुणाचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून, संशयितांची चौकशी सुरू

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील कळमनूरी तालुक्यात एका तरुणाचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना मंगळवारी (ता. 14) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. कळमनुरी निकेश कांबळे (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे.

काय आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनूरी शहरालगत हिंगोली मार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे जमादार लक्ष्मण कऱ्हाळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, जगताप यांच्या पथकाने पहाटे दोन वाजता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाचा गळा आवळल्याचे दिसून आले तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह साईनगर भागातील निकेश कांबळे याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

गून्हा दाखल नाही

दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील पोलिसांनी आता काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. तसेच पेट्रोल पंप व इतर दुकानांच्या सीसीटीवी फुटेज वरुन आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. तसेच मृत व्यक्तीच्या मोबाईल वरुन खूनाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणात अद्यापही खूनाचा गुन्हा दाखल झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...