आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • In Hingoli, Children Killed Their Father In An Old Dispute; The Crime Was Uncovered When The Police Arrived Before The Evidence Was Destroyed

केवढे हे क्रौर्य:हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांचा केला खून; पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलिस पोहोचल्याने गुन्हा उघडकीस

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे जुन्या वादातून दोन मुलांनी जन्मदेत्या वडिलांना मारहाण करुन खून केल्याची घटना शनिवारी 4 जून रोजी घडली आहे. याप्रकरणात पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलिस पोहोचल्याने खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणी दोन मुलांवर सोमवारी (ता.6) सेनगांवपो पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय आबाराव देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कौटुंबिक वादातून केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील संजय आबाराव देशमुख व त्यांची दोन्ही मुले निखिल संजय देशमुख, गजानन संजय देशमुख यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होता. त्यातून छोट्या-मोठ्या कुरबुरी होत होत्या. म्हणून हा खून केला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे.

काठीने व लाकडाने मारहाण केली

दरम्यान शनिवारी (ता.4) रात्री साडेसात वाजता निखील देशमुख व गजानन देशमुख या दोघांनी त्यांचे वडील संजय देशमुख यांना काठीने व लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रविवारी दोन्ही मुलांनी संजय देशमुख यांना उपचारासाठी रिसोड येथे दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाशिम येथे हलवले. त्याठिकाणीही प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी अकोला येथे नेण्यास सांगितले. मात्र दोन्ही मुलांनी त्यांना अकोला येथे न नेता रात्री पानकनेरगाव येथे आणले. मात्र रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

अंगावर केले गेले घाव

दरम्यान, खूनाची घटना लपवण्यासाठी दोन्ही मुलांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंत्यविधीची तयारी केली. मात्र या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने रात्री पानकनेरगाव गाठले. पोलिसांनी मृत संजय देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. यामध्ये मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने तपासात स्पष्ट झाले.

यावरुन शिवाजी आबाराव देशमुख यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी निखिल संजय देशमुख व गजानन संजय देशमुख या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक भोईटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...