आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्याप गुन्ह्यांची नोंद नाही:हिंगोली शहरात अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ, खून की अपघात याबाबत तपास सुरू

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील सरस्वतीनगर भागामध्ये सोमवारी ता. एक पहाटे उपचार सुरू असताना एका व्यक्तीच्या मृत्यू खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचा खून की अपघात याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील सरस्वतीनगर भागामध्ये एका ऑइल मिल जवळ रविवारी ता. 31 रात्री एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, जमादार संजय मार्के, शेषराव पोले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्री साडेअकरा वाजता सदर व्यक्तीला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

दरम्यान त्या व्यक्तीचा खून का अपघात याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटविण्यासाठी परिसरात माहिती घेतली जात असल्याचे शहर पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...