आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद:हिंगोली जिल्ह्यात घराचे माळवद अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील सवना येथे घराचे जुने माळवद अंगावर कोसळून एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अरुणा गजानन अरसोड (४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

सेनगाव तालुक्यातील सवना येथे गजानन अरसोड यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूला माळवद असून समोरच्या बाजूला दोन खोल्या आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास अरुणा अरसोड या माळवदाच्या खोलीत आराम करीत होत्या. अचानक माळवदावर असलेल्या माडीची भिंत कोसळल्याने माळवदाचा भाग त्यांच्या अंगावर कोसळला. मोठा आवाज झाल्याने घराच्या समोरील भागात बसलेेले त्यांचे कुटुंबीय, शेजारी घटनास्थळी धावले. त्यांना संपूर्ण मातीचा ढिगारा दिसून आला, तर त्यावर लाकडाच्या नाटी पडलेल्या दिसल्या. या ढिगाऱ्याखाली अरुणा अरसोड या दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...