आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्ह्यात अनैतिक संबंधात‎ अडसर ठरल्याने तरुणाचा केला खून‎:आखाडा बाळापूर येथे पत्नीसह एका जणावर गुन्हा दाखल‎

हिंगाेली‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर येथे अनैतिक संबंधात अडसर ठरत‎ असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून‎ केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांवर आखाडा‎ बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्धापूर‎ (जि.नांदेड) येथील शेख शकील शेख खाजा (३५)‎ हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पत्नीसह आखाडा‎ बाळापूर येथे नातेवाइकांकडे आले होते. रात्री सात‎ वाजेच्या सुमारास शेख शकील यांच्या पत्नीने त्यांना‎ काही पैसे देऊन ही रक्कम बँकेत भरणा करण्यास‎ सांगितले. मात्र बँक बंद झाल्यामुळे रक्कम कशी भरणा‎ करायची, असा प्रश्‍न शेख शकील यांनी उपस्थित‎ केला. मात्र ऑनलाइन रक्कम भरणा करा, असे खोटेच‎ सांगून त्यांना घराबाहेर पाठवले. त्यानंतर ते घरी‎ परतलेच नाही. दरम्यान, मध्यरात्री सुमारास बोल्डा रोड‎ भागात एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती‎ पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस‎ निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी‎ बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने‎ तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह आखाडा बाळापूर‎ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. हा मृतदेह‎ शेख शकील यांचा असल्याचे स्पष्ट झाले.‎

याप्रकरणी शेख शकील यांच्या नातेवाइकाने‎ सायंकाळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार‎ दाखल केली. यामध्ये शेख शकील यांची पत्नी व‎ डोंगरकडा येथील शेख मोहसीन यांचे अनैतिक संबंध‎ होते. या संबंधामध्ये अडसर येत असल्याने दोघांनी‎ मिळून शेख शकील यांचा गळा दाबून तसेच डोक्यात‎ दुखापत करून खून केल्याचे नमूद केले. यावरून‎ पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.‎

बातम्या आणखी आहेत...