आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पोतरा येथे गर्भपाताच्या कारणावरून महिलेस मारहाण, चाैघांवर गुन्हा दाखल

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे गर्भपात करण्याच्या कारणावरून महिलेचा छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सासरच्या चौघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोतरा येथील कांचन रणवीर ही महिला माहेरी काम करीत असताना तिच्या सासरची मंडळी तेथे आली. तू गर्भपात का करीत नाही, या कारणावरून त्यांना मारहाण केली. आखाडा बाळापूर पोलिसांनी सचिन रणवीर, मारोती रणवीर, आर्यन रणवीर यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...