आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण खून:सेनगाव तालुक्यामध्ये गळा चिरून निर्घृण खून, दुचाकीसह मृतदेह पुलावरून पाण्यात फेकला

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील बनबरडा शिवारात एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे गळा कापून खून केल्याची घटना रविवारी (७ अॉगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. हरिदास टापरे (रा. पांगरी) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपींनी खून करून मृतदेह दुचाकीसह पुलावरून नाल्याच्या पाण्यात फेकल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

बनबरडा शिवारात सरस्वती नाला आहे. या नाल्याच्या पुलावरूनच शेतकरी शेतात ये-जा करतात. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुलाखालील पाण्यात दुचाकी आढळून आली. नंतर काही शेतकऱ्यांनी बारकाइने पाहणी केली असता बाजूला एका तरुणाचा मृतदेही आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी जमा झाले. काही वेळातच सेनगावचे पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, सतीश ठेंगे, जमादार अनिल भारती, सुदर्शन खांडेकर, जीवन मस्के आदी घटनास्थळी दाखल झाले. या मृतदेहाजवळ आढळून आलेली दुचाकी क्रमांकावरून अकोला पासिंगची आहे. दुचाकीचा क्रमांक (एमएच ३० एम १२७२) असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे पुलावर आणि रस्त्यावर रक्त सांडलेले असल्याने या तरुणाचा खून झाल्याची शक्यता होती. यानंतर पांगरी येथील हरिदास टापरे याचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...