आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण सुटल्याने कार थेट तलाव्याच्या पाण्यात:औंढ्यात कार रिव्हर्स घेताना तळ्यात; चालकाचा मृत्यू

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथे कार रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट तलाव्याच्या पाण्यात बुडली. यामध्ये कारमधील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर क्रेनच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. गुरुवारी (८ सप्टेंबर) औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. चक्रधर गजानन सावळे (२०, रा. निशाणा) असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथील चक्रधर सावळे यांचे औंढा नागनाथ येथे मंदिराच्या पूर्व बाजूला टेंट हाऊसचे दुकान आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चक्रधर हे बाहेरगावाहून दुकानात आले होते. त्यानंतर ते कार रिव्हर्स घेत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार थेट गयातीर्थ तलावात बुडाली. चक्रधर यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली.

बातम्या आणखी आहेत...