आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू:जयपूर शिवारातली घटना; तर एक जण गंभीर जखमी

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत नागनाथ दत्तराव पायघन - Divya Marathi
मृत नागनाथ दत्तराव पायघन

हिंगोली सेनगाव तालुक्यातील जयपूर शिवारात शनिवारी (30 जुलै) दुपारी शेतात झाडाखाली थांबलेल्या शेतकरी व शेतमजूराच्या अंगावर विज पडल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून मजूर गंभीर जखमी झाला आहे. नागनाथ दत्तराव पायघन (वय -35) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

विज पडण्याने मृत्यू

मिळालेल्या माहितीनूसार, सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील नागनाथ पायघन यांचे जयपुर शिवारात शेत आहे. आज सकाळी नागनाथ पायघन व शेत मजूर दत्ता पायघन हे शेतात कामासाठी तसेच पीक पाहणीसाठी गेले होते. दुपारपर्यंत शेतात काम केल्यानंतर दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे नागनाथ व दत्ता हे दोघेही शेतातील झाडाखाली थांबले होते. याच वेळी त्यांच्या अंगावर विज कोसळली. यावेळी मोठा आवाजही झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.

पालघन कुटुंबावर दु:खाचा डोंगर

दरम्यान, काही वेळातच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावले. त्यांनी नागनाथ व दत्ता यांना तातडीने उपचारासाठी रिसोड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र नागनाथ पायघन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. तर दत्ता पायघन यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृत नागनाथ पायघन यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...