आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मराठवाड्यातील 39 लाख शेतकऱ्यांनी भरला विमा, 31 जुलै रोजी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील ३९.२५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरून २०.९५ लाख हेक्टर संरक्षित केले आहे. आता पीक विमा भरण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपणार असून यामुळे आणखी शेतकरी पीक विमा भरण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६९ टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला आहे.

या वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागासोबतच महसूल विभागानेही केले आहे. त्यानुसार मराठवाड्यात २५ जुलैपर्यंत ३९.२५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून या शेतकऱ्यांनी २०.९५ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. विविध पिकांनुसार शेतकऱ्यांनी १०५३६ कोटी रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली असून त्यासाठी २३२.५२ कोटी रुपयांचा विमा हप्ता संबंधित कंपनीकडे भरला आहे. या वर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३९.२५ लाख असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ६९ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील ३.४१ लाख शेतकऱ्यांनी १.४५ लाख हेक्टरसाठी पीक विमा भरला आहे. जालना ३.३६ लाख शेतकऱ्यांनी १.४१ लाख हेक्टर, बीड १०.४६ लाख शेतकऱ्यांनी ३.९७ लाख हेक्टर, लातूर ४.१७ लाख शेतकऱ्यांनी २.७६ लाख हेक्टर, उस्मानाबाद ३.७६ लाख शेतकऱ्यांनी २.९२ लाख हेक्टर, नांदेड ७.७८ लाख शेतकऱ्यांनी ४.५८ लाख हेक्टर, परभणी ३.९८ लाख शेतकऱ्यांनी २.५० लाख हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २.३४ लाख शेतकऱ्यांनी १.३३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी विमा भरला.

बातम्या आणखी आहेत...