आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Keep The Contact System In The Emergency Center Ready; The Administration In Marathwada Started Work For Pre monsoon Preparations |marathi News

दिव्य मराठी विशेष:इमर्जन्सी सेंटरमधील संपर्क यंत्रणा सज्ज ठेवा; मान्सूनपूर्व तयारीसाठी मराठवाड्यातील प्रशासन लागले कामाला

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात मान्सूनच्या काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीची मदत मिळावी यासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमधील संपर्क यंत्रांची तातडीने दुरुस्ती करून यंत्र सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.

मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये अनेक वेळा नदी व नाल्याचे पुराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याशिवाय पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी व शेतमजूर अडकल्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारी केली जाते. या वर्षीही मराठवाड्यात जिल्हा प्रशासनाने सोबतच जिल्हा परिषद व पोलिस अधीक्षक कार्यालयांना मान्सूनपूर्व तयारीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा स्तरावरील सर्व खाते प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याशिवाय जिल्हा नियंत्रण कक्षातील १०७७ हा टोल फ्री नंबर तातडीने सुरू करावा, पूर बचाव साहित्याची साठवणूक, देखभाल-दुरुस्ती याबाबत खबरदारी घ्यावी, जिल्ह्यातील आपत्तीप्रवणता लक्षात घेऊन रंगीत तालीम घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आपत्ती विचारात घेऊन आपत्तीपूर्व आपत्ती दरम्यान व आपत्ती पश्चात काय करावे व काय करू नये याविषयी प्रत्येक गावात जनजागृती करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. जिल्ह्याच्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये असलेल्या सर्व यंत्रणेची तपासणी व दुरुस्ती करून घ्यावी, जिल्ह्यातील वाहणाऱ्या नदीचे नैसर्गिक पत्र अतिक्रमणामुळे अरुंद झाले असेल तर तातडीने अतिक्रमण हटवण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका यांना शहरातील मान्सूनपूर्व सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील पाझर तलाव, साठवण तलावांची दुरुस्ती करा
मराठवाड्यातील पाझर तलाव, साठवण तलावाची देखभाल दुरुस्ती करावी, तलावाच्या भिंतींना भेगा पडल्या असल्यास तातडीने दुरुस्ती करावी. तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा होऊन तलाव फुटण्याची शक्यता लक्षात घेता या विभागाने तलावाचे बांधकाम केले त्या विभागाने तलावासाठी अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाच्या सूचनेनंतर हिंगोली जिल्ह्यात प्रशिक्षण
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनंतर हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. औंढा नागनाथ येथील तलावांमध्ये पूरपरिस्थिती लक्षात घेऊन प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना बोटीद्वारे कसे बाहेर काढावे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात काय करावे, याबाबत माहिती दिली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...