आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत शिवसैनिक आक्रमक:कोश्यारींच्या फोटोला मारले जोडे; तर 'राष्ट्रवादी'ने केले प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या फोटोला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (21 नोव्हेंबरला) सकाळी जोडे मारत आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

येथील महात्मा गांधी चौकात आयोजित आंदोलनास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, हिंगोली विधानसभा संघटक उद्धव गायकवाड, जिल्हा संघटक हिंगोली विधानसभा बाळासाहेब मगर,नंदू खिलारे, प्रा. मोरे, राजभाऊ पाटील, आसिफ पठाण, पंढरीनाथ ढाले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, अविनाश चव्हाण, शेख अतिक, आसिफ पठाण, करण मुदीराज, रवी काळे, सचिन काळे, करण शिंदे, मंगेश डोलारे, सुधीर गरड, बालाजी पाटील, शिवाजी सरकटे, गणेश राजुलवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी नगराध्यक्ष जगजीत खुराणा, बालाजी घुगे, सय्यद जावेद राज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...