आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 तासात चोरट्यांचा डल्ला:बाळापुरात सराफा दुकानाचे शटर उचकटून 2 लाखांचे दागिने लंपास

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडाबाळापुर येथील मदीना ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेख इरफान यांचे मदिना ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे.रविवारी रात्री 12 च्या सुमारास दुकान बंद करून शेख इरफान घरी गेले होते. त्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास शेख यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. यानंतर शेख यांनी लगेच बाळापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. आणि दुकानाकडे धाव घेतली यावेळी दुकानाचे शटर उघडलेले व कुलूप तोडलेले त्यांच्या लक्षात आले.

शेख इरफान हे रात्री बारावाजेपर्यंत दुकानात काम करत बसले होते. तर पहाटे 4 वाजता ही घटना त्यांच्या लक्षात आली. अवघ्या 4 तासात चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारत 2 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत संशयिताचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...