आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत विद्यार्थिनीवर अत्याचार:प्रेम केले, लग्नाचे आमिषही दाखवले पण नंतर प्रियकरानेच केला अत्याचार! विद्यार्थिनीच्या जबाबातून माहिती उघड

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील एका वसतीगृहातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीचा शोध लागला असून तिला तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आणि अत्याचार केला, असा जबाबच आता या मुलीने दिला आहे.

शनिवारी (ता. 7) हिंगोली शहर पोलिसांकडे तिने जबाब नोंदवला. तिने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी तरूणाविरुद्ध अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश धनवे ( रा. वाळकी ) असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील एका वसतीगृहातील विद्यार्थिनी बीए तृतीय वर्षात शिक्षण घेते. बुधवारी (ता. 4) सकाळी महाविद्यालयात जात असल्याचे सांगून ती वसतीगृहातून निघाली. याबाबत तिने वसतीगृहाच्या रजिस्टरमध्ये नोंदही केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती परत आली नाही, त्यामुळे वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, जमादार एम. एम. टाले यांच्या पथकाने तिचा शोध सुरू केला होता.

विद्यार्थीनी रुग्णालयात झाली भरती

शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी हि विद्यार्थिनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन मुलीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला मात्र तिची मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे पोलिसांनी आज जबाब नोंदवला.

प्रियकराकडून लग्नास नकार

प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवून विदर्भात नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर तरुणाने तिच्यासोबत लग्नास नकार दिला. त्यानंतर तिला हिंगोली येथे आणून सोडले. पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार टाले पुढील तपास करीत आहेत

बातम्या आणखी आहेत...