आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महा आवास अभियान:सर्वोत्कृष्ठ जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम, धाराशिव द्वितीय तर हिंगोली तिसऱ्या स्थानावर

हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात महा आवास अभियानामध्ये सर्वोत्कृष्ठ जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम, धाराशिव द्वितीय तर हिंगोली जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार मिळविला असून मंगळवारी ता. १६ सकाळी आकरा वाजता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेची गतीमान अंमलबजावणी करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कामांसाठी 20 नोव्हेंबर 2021 ते 5 जून 2022 या कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात आले आहे. या अभिायनांतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना राबविलेल्या विविध उपक्रमांचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यानुसार उत्कृष्ठ काम करणाऱ्या यंत्रणांना महा आवास अभियान ग्रामीण हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या जिल्हा परिषदांचा क्रमांक

या अभियानांतर्गत मराठवाडयात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे मुल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड झालेल्या यंत्रणांची विभागीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ठ जिल्हा परिषदेमध्ये प्रथम छत्रपती संभाजी नगर, द्वितीय धाराशिव, तृतीय हिंगोली आले आहेत.

पंचायत समितीमध्ये यांचा समावेश

सर्वोत्कृष्ठ पंचायत समितीमध्ये प्रथम पंचायत समिती भोकर, द्वितीय पंचायत समिती फुलंब्री, तृतीय पंचायत समिती वैजापूर. सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत प्रथम ग्रामपंचायत अंबातांडा (ता. कन्नड), द्वितीय ग्रामपंचायत आष्टा (ता. लोहरा), तृतीय ग्रामपंचायत गोपा (ता. गंगाखेड) यांचा समावेश आहे.

या शिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ठ जिल्हा परिषद प्रथम छत्रपती संभाजीनगर, द्वितीय धाराशिव. तृतीय परभणी. सर्वोत्कृष्ठ पंचायत समिती प्रथम पंचायत समिती कळंब, द्वितीय पंचायत समिती वैजापूर, तृतीय.य पंचायत समिती पैठण. सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत प्रथम ग्रामपंचायत खलंग्री (ता. रेणापूर), द्वितीय ग्रामपंचायत दाभरूळ (ता. पैठण), तृतीय ग्रामपंचायत जळकी (ता. सिल्लोड) यांचा समावेश आहे.

मंगळवारी पुरस्काराचे वितरण

विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी (दि.16) सकाळी 11 वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गटविकास अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सरपंच, ग्रामसेवक यांना उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.