आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कळमनुरी येथे दारूच्या नशेत मित्राने केला मित्राचा खून, आरोपी अटकेत

3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरामध्ये दारूच्या कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 21) रात्री घडली. लाकडाच्या काठीने तोंडावर मारहाण करून मित्राची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शेख अकबर उर्फ निबर शेख जहूर (वय ४०) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील शेख अकबर हे हमाली करून उदरनिर्वाह चालवतात. तर, त्यांचा मित्र असलेल्या शेख रोफ शेख मुनीर (वय ४० ) हा हमालीसोबतच बस स्थानक परिसरातील हॉटेल, पानपट्टींसमोर झाडझुड करून आपला उदरनिर्वाह चालवतात.

दरम्यान सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघांनीही दारू पिली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी शेख अकबर याने दारूच्या नशेत लाकडी काठीने शेख रोफ यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शेख रोफ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कळमनुरी शहरात अफवांचे पेव फुटले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, जमादार प्रशांत शिंदे, खिल्लारे, भडके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणात कळमनुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तातडीने शेख अकबर याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...