आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक सुधारणांमध्ये महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकावर झेप:केंद्र सरकारचा अहवाल, भौतिक सुविधा पुरवण्यात राज्य देशात अव्वल

मंगेश शेवाळकर | हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राची आठव्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकावर झेप
  • भौतिक सुविधा अन शासकिय प्रक्रियेमध्ये ५९ गुणांची वाढ, राज्याला १००० पैकी ९२८ गुण

केंद्र शासनाने देशभरातील शाळांचा सन २०२०-२१ मधील परफॉर्मंन्स ग्रेडींग इंडेक्स जाहिर केला आहे. यामध्ये महाराष्ट्राने यावेळी ९२८ गुण मिळवत आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भौतिक सुविधा अन शासकिय प्रक्रियेच्या गुणांमध्ये भरीव वाढ झाल्यामुळे राज्याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.

असे होते गुणांकन

देशात शालेय शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. शासनातर्फे एमआयएस, युडायस, नॅस व एमडीएम पोर्टलवर विविध उपक्रमाची माहिती भरली जाते. या माहितीच्या आधारे गुणांकन देऊन त्या भागातील शाळांचा परफॉर्मंन्स ग्रेडींग इंडेक्स काढला जात आहे. केंद्र शासनाने सन २०१७-१८ ते सन २०१९-२० या वर्षांसाठी तीन अहवाल प्रसिध्द केले आहेत.

यंदा सर्वाधिक गुण

यामध्ये पाच क्षेत्र व ७० निर्देशक आहेत. १००० गुणांतर्गत ७० निर्देशक समाविष्ट असून यामध्ये प्रामुख्याने निष्पत्ती व प्रशासन आणि व्यवस्थापन अंतर्गत गट आहेत. तसेच पुढील पाच क्षेत्रामध्ये अध्ययन निष्पत्ती, प्रवेश, पायाभुत सुविधा, समता व प्रशाकिय प्रक्रियेचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राने १००० पैकी ९२८ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सन २०१९-२० मध्ये महाराष्ट्र आठव्या स्थानावर होता. त्यावेळीच्या तुलनेत यावेळी ५९ गुणांची वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने भैतिक सुविधा व शासकिय प्रक्रिया या दोन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे.

समाधानाची बाब

देशात परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स मध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळविल्याने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाची हि नांदीच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्याचे मागील वर्षांचे गुणांकन

  • अध्ययन निष्पत्ती : सन २०१९-२० प्रमाणेच २०-२१ मध्ये १४४ गुण
  • शाळा प्रवेश व निष्पत्ती ​​​​​​​: सन २०१९-२० प्रमाणेच २०-२१ मध्ये ७६ गुण
  • भौतिक सुविधा : मध्ये सन २०१९-२० मध्ये १२६ तर २०-२१ मध्ये १४३ गुण
  • समता : सन २०१९-२० मध्ये २२४ तर २०-२१ मध्ये २२५ गुण
  • शासकिय प्रक्रिया : सन २०१९-२० मध्ये २९९ तर २०-२१ मध्ये ३४० गुण
बातम्या आणखी आहेत...