आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मॉर्निंग वॉकला जाताच मंगळसूत्र हिसकावले

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला दुचाकीवर आलेल्या दोघांनी खाली पाडून तिच्या गळ्यातील चार तोळ्यांचे साेन्याचे मंगळसूत्र पळवल्याची घटना घडली. याप्रकरणी वसमत शहर ठाण्यात १३ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील चौधरीनगर भागातील रहिवासी असलेल्या सुशीला अशोक अवधुता ह्या शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी मालेगाव रोड भागात गेल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परत येत असताना एका दुचाकीवर दाेघेजण आले. अवधुता यांना संशय आल्यामुळे त्यांनी पायी चालण्याचा वेग वाढवला. मात्र, दुचाकीवरील दोघांनी निर्मनुष्य रस्ता पाहून अवधुता यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुशीला अवधुता यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत दुचाकीवरील चोरटे फरार झाले. वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक महिपाळे, जमादार भगीरथ सवंडकर, चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...