आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:रेशमाच्या कोषांनी मराठवाडा ठरणार अव्वल; 41 टक्क्यांवर तुती लागवड

मंगेश शेवाळकर | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महारेशीम अभियानांतर्गत राज्याला ५,००० हेक्टर तुती लागवडीचे उद्दिष्ट आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त २०७५ हेक्टरवर तुती लागवड होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. बीड व जालना येथे रेशीम कोष खरेदी केंद्र असल्यामुळे मराठवाड्याला जास्त उद्दिष्ट देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात रेशीम विभागाच्या माध्यमातून २०१८ ते २०२३ पर्यंत रेशीम अभियान राबवले जात आहे. दरवर्षी महारेशीम अभियान राबवून तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांची नोंदणीही करून घेतली जाते. दरम्यान, या वर्षी राज्यात ५,००० हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीचे काम केले जाईल.

कुठे किती उद्दिष्ट जिल्हा हेक्टर क्षेत्र जालना ३०० बीड ३०० उस्मानाबाद ३५० परभणी २२५ जिल्हा हेक्टर क्षेत्र नांदेड२०० लातूर२०० हिंगोली २००

राज्यात रेशीम उत्पादनात बीड जिल्हा ठरला अग्रेसर रेशीम उत्पादनात बीड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. बीडमध्ये उत्पादित होणारे रेशीम बंगळुरूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात होते. परंतु एक वर्षापासून बीड बाजार समितीत रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर राज्यात जाण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे त्यांचा खर्च आणि वेळ वाचला असून स्थानिक बाजारपेठेत उत्तम भाव मिळत आहे. गेवराई तालुक्यात रुई हे गाव रेशीम हब आहे. पूर्ण गावातील शेतकरी रेशीमचे उत्पादन घेतात. त्यामुळे गेवराई तालुका आणि जिल्ह्यात रेशीम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

राज्यात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, वर्धा, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी २०० हेक्टर, वाशिम, जळगाव प्रत्येकी १०० हेक्टर, नागपूर, सांगली, कोल्हापूर प्रत्येकी १५० हेक्टर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार प्रत्येकी २५ हेक्टर, अहमदनगर २४० हेक्टर, पालघर ७५ तर सिंधुदुर्ग १० हेक्टर, नाशिक १२५ हेक्टरचे उद्दिष्ट दिले आहे.

तुती लागवडीनंतर किडे वाटप मराठवाड्यात सर्वाधिक २०७५ हेक्टरवर तुतीच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे. बीड, जालना या ठिकाणी रेशीम कोष खरेदी केंद्र असल्यामुळे या जिल्ह्यात सर्वाधिक उद्दिष्ट आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून जूनमध्ये तुतीची लागवड केल्यानंतर त्यांना रेशीम कार्यालयाकडून रेशीम किडे वाटप केले जातील असे कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात रेशीम उत्पादनात बीड जिल्हा ठरला अग्रेसर रेशीम उत्पादनात बीड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. बीडमध्ये उत्पादित होणारे रेशीम बंगळुरूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात होते. परंतु एक वर्षापासून बीड बाजार समितीत रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर राज्यात जाण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे त्यांचा खर्च आणि वेळ वाचला असून स्थानिक बाजारपेठेत उत्तम भाव मिळत आहे. गेवराई तालुक्यात रुई हे गाव रेशीम हब आहे. पूर्ण गावातील शेतकरी रेशीमचे उत्पादन घेतात. त्यामुळे गेवराई तालुका आणि जिल्ह्यात रेशीम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...