आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री शांतनु ठाकुरांना पुसेगांवच्या शहीद जवानाचा पडला विसर:हिंगोलीत असतानाही अंत्यसंस्काराला गैरहजेरी चर्चेचा विषय

हिंगोली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांना मात्र पुसेगाव येथील शहीद जवानाचा विसर पडला आहे. हिंगोली जिल्हयात निवडणुकीच्या निमित्ताने मेळावे घेत फिरणाऱ्या ठाकुर यांना जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ मिळाला नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून त्यांची गैरहजेरी जिल्हयात चर्चेचा विषय बनली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील जवान भगवान खंदारे हे भारतीय रिझर्व्ह बटालीयन मध्ये सन 2000 मध्ये रुजू झाले होते. सध्या ते लक्षद्वीप येथे कर्तव्यावर होते. या ठिकाणी कर्तव्यावर असतांना सोमवारी (ता. 19) जवान खंदारे शहीद झाल्याचा संदेश त्यांच्या कुटुंबियांना मिळाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशाखापट्टणम येथे आणले गेले. त्याठिकाणी पार्थिवावर उत्तरीय तपासणी करून पुसेगाव येथे गुरुवारी (ता. 22) आणण्यात आले होते. पुसेगाव येथे शहीद जवान भगवान खंदारे यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जवान भगवान खंदारे अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. यावेळी परिसरातील हजारो नागरीक उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वातावरण निर्मिती करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर बुधवारपासून (ता. 21) हिंगोली जिल्हयात आले आहेत. मागील तीन दिवसांत त्यांनी भरगच्च कार्यक्रमही घेतले. कुठे मेळावे घेतले तर कुठे स्वस्त औषधी केंद्राला भेट दिली. मात्र भाजपाच्या राज्यमंत्र्यांना शहीद जवान भगवान खंदारे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याचा विसर पडला का वेळ मिळाला नाही याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे काही नेते त्या ठिकाणी हजर असतांना त्यांनी या घटनेची माहिती ठाकूर यांना का दिली नाही असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यमंत्री ठाकूर यांच्या दौरा पुर्वीच ठरला होता. त्यामुळे त्यांना हजर राहाता आले नसल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...