आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण निर्मूलन कार्यक्रम:दीड हजारांवर चिमुकल्यांना सशक्त बनवणारा ‘मिशन स्वस्थ बालक’, महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली : अंगणवाडीत बालकाची उंची मोजताना. - Divya Marathi
हिंगोली : अंगणवाडीत बालकाची उंची मोजताना.

कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे मिशन स्वस्थ बालक कार्यक्रम राबवला जात आहे. त्यानुसार बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करणे सुरू आहे. मराठवाड्यात एक ते दीड हजार कुपोषित बालके असून त्यांना कुपोषण मुक्त केले जाईल.

राज्यात अंगणवाड्यांमधून सुमारे १ कोटीपेक्षा अधिक बालकांची काळजी घेतली जाते. या अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचे वेळोवेळी वजन, उंची घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांसोबतच इतर सर्व बालकांना पोषण आहार देऊन त्यांचे कुपोषण दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. अति तीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ‘मिशन स्वस्थ बालक’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी १ मार्चपासून ३१ मार्च या कालावधीत आरोग्य विभागाच्या मदतीने या संदर्भात राज्याच्या बाल कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवले आहे.

आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांचे स्क्रीनिंग केले जाणार
मराठवाड्यामध्ये सध्याच्या स्थितीत एक ते दीड हजार कुपोषित बालके आहेत. बाल कल्याण विभागाच्या वतीने आजपासून आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. यामध्ये नव्याने आलेल्या तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करून त्यांना कुपोषणमुक्त केले जाणार आहे. - गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, हिंगोली.

काय उपाययोजना करणार?
अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाईल व त्यात आढळून आलेल्या कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल केले जाणार आहे.
या ठिकाणी या बालकांना एनर्जी डेन्स न्यूट्रिशियन फूड दिले जाणार असून त्यांची दर पंधरा दिवसांनी आरोग्य तपासणीही केली जाईल.
बालकांना पोषण आहार तसेच त्यांच्यावर औषधोपचार केल्यानंतर जुलै महिन्यात या बालकांची आरोग्य तपासणी होणार आहे
किती बालके सर्वसाधारण श्रेणीत आलेली आहेत याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...