आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार संतोष बांगरांची पुन्हा दमदाटी:वीज खंडीत करणाऱ्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याची भाषा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हिंगोली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीचे आमदार आधी उद्धव ठाकरेंसाठी रडताना पाहिले नंतर मुख्यमंत्री शिंदेंसाठी हसताना आणि त्यांच्यासाठी लढताना पाहिले पण आता ते लोकांशी नडताना दिसत आहेत. त्यांनी आधी हिंगोलीत डाॅक्टर आणि एका विमा कंपनीतील व्यक्तीला दमदाटी केल्यानंतर आता पुन्हा वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दमटाची केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यांच्या दमदाटीचा व्हिडीओही समोर आला आहे.

रट्टे देण्याची भाषा

शेतीपंपाचा विज पुरवठा खंडीत करू नका असे सांगितल्यानंतरही विज पुरवठा का खंडीत केला असा सवाल करीत शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याचा इशारा देत दमदाटी केली. शुक्रवारी (ता. 25) त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आमदार बांगरांकडे शेतकऱ्यांची तक्रार

औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी व म्हाळजगाव येथील कृषी पंपाचा विज पुरवठा विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खंडीत केला. त्यामुळे पाणी असूनही हरभरा पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडे तक्रारी सुरु केल्या. त्यानंतरआमदार बांगर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला दुरध्वनीवरून दमदाटी केली.

तुला कळत नाही का?

बांगर यांच्या व्हायरल व्हिडीओत वीज कर्मचाऱ्याला असे म्हटले की, तु कुठला आहेस, औंढ्याचा आहेस का. तुला कळत नाही का इकडची लाईन तोडू नये. औंढ्याचा आहेस म्हणून..नाही तर दुसरे कुणी असते तर रट्टे दिले असते. इकडची लाईन तोडायची नाही बरं..

सोशल मीडियावर व्हायरल

आमदार बांगर यांचा एक व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल झाला आहे. यात विज पुरवठा खंडीत करू नका असे सांगितले असतांनाही विज पुरवठा का खंडीत केला, यापुढे रट्टे देईल अशा शब्दात त्यांनी विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली गेली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला असून आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.

कृषी पंपाची 300 कोटी थकबाकी

हिंगोली जिल्ह्यात कृषी पंपाचे सुमारे 71 हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे चालू देयकासह थकबाकीची सुमारे 300 कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम आहे. या थकबाकीसाठी विज कंपनीकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कृषीपंपाचे विज देयक भरू शकले नाही.

वीज कंपनीकडून कारवाही

शेतकऱ्यांकडून शेतीपंपाचे 3 एचपीसाठी 3000 रुपये व 5 एचपी क्षमतेच्या शेतीपंपासाठी 5000 रुपयांचा चालु देयकाचा भरणा करून घेण्याच्या सुचना वरिष्ठ कार्यालयाने विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कृषी पंपाच्या वसुलीसाठी विज पुरवठाच खंडीत करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...