आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत उद्या जन आक्रोश आंदोलन:छपरा रेल्वेसाठी व्यापारी महासंघ आक्रमक; दुकाने बंद ठेवून 3000 जण मोर्चात होणार सहभागी

हिंगोली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना छपरा ही रेल्वे हिंगोली मार्गे सोडावी या मागणीसाठी बुधवारी (23 नोव्हेंबर) आयोजित जन आक्रोश आंदोलनात व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट ) प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेणवाणी यांनी दिली आहे.

जालना छपरा ही रेल्वे हिंगोली मार्गे सोडली जाणार होती. मात्र, राजकीय दबावापोटी सदर रेल्वे जालना औरंगाबाद मार्गे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेचा मार्ग बदलल्यामुळे पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या भागातील प्रवासी व व्यापाऱ्यांची मोठे नुकसान होत आहे. तसेच रेल्वे हिंगोली मार्गे सोडावी यासाठी हिंगोली जिल्ह्यात जन आक्रोश आंदोलन केले जाणार आहे.

या रेल्वेसोबतच हिंगोली मार्गे मुंबईसाठी नवीन रेल्वे सोडावी, हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर गुडस् शेड उभारावे याशिवाय इतर नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आयोजित या आंदोलनामध्ये अखिल भारतीय व्यापारी संघटना कॅट संलग्नित सर्व व्यापारी सहभागी होणार आहेत. बुधवारी ता. 23 व्यापारी संघटना व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून आंदोलनात सहभागी होतील. सुमारे 3000 पेक्षा अधिक लहान मोठे व्यापारी यामध्ये सहभागी होणार असून रेल्वे संघर्ष समितीकडून घेतल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या निर्णयाला संघटनेचा पाठिंबाचा राहणार असल्याचे नेनवाणी यांनी सांगितले. या आंदोलनात व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...