आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेकुळाष्टमी विशेष:पाचशेपेक्षा जास्त पशुधन; पण दूध न विकणारे गाव; गावातच वापरतात 500 लिटरवर दूध

मंगेश शेवाळकर | हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी या गावातील नंदगवळी समाजबांधवांनी दुधाची विक्री न करण्याची परंपरा आजही जपली आहे. यामागे कोणतीही आख्यायिका नाही. मात्र जुन्या पिढीने सांगितले आणि नव्या पिढीने परंपरा पुढे नेली. राेज गावात पाचशे लिटर दूध उपलब्ध हाेते, मात्र विक्री केली जात नाही. गावात श्रीकृष्णाचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी गोकुळाष्टमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम हाेतात.

अनाेखी परंपरा जपणाऱ्या गावाची लोकसंख्या ३००० असून २२५ कुटुंबे राहतात. त्यातही ९० टक्के कुटुंबे नंदगवळी समाजाची आहेत. या समाजातील प्रत्येकाकडे एक गाय आहे. गावात ३०० हून अधिक गायी तर २०० हून अधिक म्हशी आहेत. गावात रोज किमान ५०० लिटर दूध उपलब्ध होते. मात्र त्याची विक्री केली जात नाही. गावात कुणाला गरज असेल तर दूध मोफत दिले जाते. याविषयी गावातील सत्तरवर्षीय लीलाबाई मंदाडे म्हणाल्या, दूध का विकत नाहीत, याबाबत नेमकी माहिती नाही. पिढ्यान‌्पिढ्यांपासून त्यांनी ही परंपरा आजही कायम ठेवलीय.

आज पालखी मिरवणूक
पुरातन श्रीकृष्ण मंदिरातून शुक्रवारी (१९ ऑगस्ट) सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

लोकवर्गणीतून जमवणार
येहळेगावातील श्रीकृष्ण मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. यासाठी सुमारे ८० लाखांची लोकवर्गणी जमा केली जाणार आहे. सध्या ३५ लाख रुपयांची लोकवर्गणी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...