आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:टेंभूरदरा शिवारात महिलेचा डोक्यात दगड घालून खून

हिंगोली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा तालुक्यातील टेंभूरदरा शिवारामध्ये एका महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी (२० जून) सकाळी उघडकीस आली आहे. अहिल्याबाई खुडे (७२) असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभूरदरा शिवारामध्ये अहिल्याबाई व त्यांची सून शांताबाई या कुटुंबीयांसह आखाड्यावर राहतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरून काही जणांनी शांताबाई यांना मारहाण केली. त्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवले. त्यामुळे शेतातील आखाड्यावर अहिल्याबाई एकट्याच होत्या. आज सकाळी काही शेतकऱ्यांना अहिल्याबाई यांचा मृतदेह आखाड्याजवळ आढळून आला. त्यांच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कळंबोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार चाटसे, प्रशांत शिंदे, वाखारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, अहिल्याबाई यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील आखाड्यावरील शेतकऱ्यांचा जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. शांताबाई यांच्या माहितीनंतर नेमके खुनाचे काय कारण आहे याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताचा शोध सुरू केला होता. त्याच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. शेताच्या कारणावरून हा खून झाला असावा अशी शक्यता आहे.

एका संशयिताला जालना येथून घेतले ताब्या
टेंभूरदरा शिवारातील अहिल्याबाई खुडे यांच्या खून प्रकरणात एक संशयित जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील व्यक्ती खून करून जालनामार्गे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कळंबोली पोलिसांनी तातडीने जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संपर्क साधला तसेच संशयिताचे छायाचित्रे देखील पाठवले त्यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...