आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:प्रेमसंबंधातील मुलीच्या नातेवाइकांकडून तरुणाचा खून, सेनगाव तालुक्यात घडली घटना

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यात खुनाच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत गुगुळ पिंपरी येथे गावात आलेला अमोल परसराम इंगोले (२६) याचा काठ्यांनी मारहाण करून खून करण्यात आला. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मंगळवारी गोरेगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अमोल परसराम इंगोले (२६) याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्या मुलीने तसेच तिच्या नातेवाइकांनी २०१३ ते २०१५ या कालावधीत अमोलविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचे तीन गुन्हे दाखल केले. त्यामुळे अमोल घाबरून गेला होता. त्यामुळे तो बाहेरगावी राहत होता. ५ एप्रिलच्या रात्री अमोल गुगुळ पिंपरी येथे घरी आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावातील विजय नामदेव इंगोले, कैलास नामदेव इंगोले, विलास नामदेव इंगोले, राजू नामदेव इंगोले, गोलू विलास इंगोले, आकाश विलास इंगोले, नामदेव मुगाजी इंगोले, देवानंद उत्तम उचित या आठ जणांनी शिवीगाळ करून लाकडाने मारहाण केली. यात अमोलचा मृत्यू झाला. पोलिसांनी विलास इंगोले व गोलू इंगोले यांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...