आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोले यांचा दावा:राज्य सरकारची मस्ती जनता लवकरच उतरवेल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एकीकडे शेतकरी-तरुणांच्या आत्महत्या होत असताना दुसरीकडे सरकार मस्तीत काम करत आहे. महाराष्ट्रातील जनता लवकरच त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (२ नोव्हेंबर) येथे पत्रकार परिषदेत केला.

येथील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील मोठे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात बाहेरराज्यात गेल्याचे भाजपचे नेते माहिती अधिकार कायद्यात उघड झाल्याचे सांगत आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, एक-एक प्रकल्प बाहेरराज्यात जात असताना लोकशाही व्यवस्थेला दाबून ठेवणारी भाजपची मंडळी माहिती अधिकार कायद्याची भाषा करीत असतील तर त्यांच्या तोंडाला लागायचे नाही. भाजप सरकार महाराष्ट्रविरोधी आहे हे जनतेला कळले आहे. खोेटे बोल पण रेटून बोल असा प्रकार सुरू आहे. राज्य सरकार स्वार्थी असल्याचा आरोपही त्यांनी केला. पटोले आज औरंगाबादेत दरम्यान, पटोले गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शहागंजातील गांधी भवनमध्ये आढावा बैठक घेतील, असे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे, शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...