आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत तालुक्यात टंचाई बैठकीत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना उभे राहून बोला, ड्राय विहीर असेल तर जागा बदला खोट्या पध्दतीने काम होत असेल तर येत्या पावसाळी अधिवेशनात वाट लावीन अशी थेट धमकीच राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजेश नवघरे यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या बोलण्याची पद्धत जिल्हाभरात चर्चेचा विषय बनली आहे.
पाणी टंचाईवर आढावा बैठक
वसमत तालुक्यातील टंचाई आढावा बैठक आमदार राजेश नवघरे यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. यावेळी वसमत तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देखील हजर होते.
सरपंचांकडून तक्रारीच तक्रारी
या बैठकीत सरपंचांनी पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात तक्रारींचा पाऊसच पाडला. ज्या ठिकाणी विहीरीला पाणी नाही त्या ठिकाणी जल वाहिन्या टाकल्या, जलकुंभ देखील उभारले. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचा आरोप काही सरपंचांनी केला. त्यावर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उत्तर देऊन शकले नाहीत.
आमदारांचा तीव्र संताप
मात्र, या बैठकीत आमदार राजेश नवघरे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ज्या ठिकाणी सरपंचांच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी पाहणी करा. कोरड्या गेलेल्या विहीरीच्या ठिकाणाच्या जागा बदला अशा सुचना देत खुर्चीवर बसून बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना उभे राहून बोला असा सज्जड दम दिला. त्यानंतर काम निट करा, खोटे काम करताल तर पावसाळी अधिवेशानात वाट लाविन असा इशारा वजा धमकीच अधिकाऱ्यांना दिली. पाणी पुरवठ्याचे काम चांगले करा नाही तर जलवाहिन्या खोदायला लावेल असा इशाराच त्यांनी दिला.
वक्तव्याची चर्चा
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांना ‘वाट लावीन’ जलवाहिन्या खोदायला लावेल अशी भाषा शोभते काय असा सुर उमटू लागला असून त्यांच्या या वक्तव्याचीच जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.