आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पोलिस ठाण्यातील 112 क्रमांकावर विनाकारण कॉल करणे पडले महागात, गुन्हा दाखल

प्रतिनिधी | हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातील डायल 112 या क्रमांकावर विनाकारण कॉल करणे सिंदगी येथील व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून त्याने विनाकारण कॉल केल्याचे निष्पन्न झाल्याने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 19 गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयात नागरीकांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात डायल 112 हा क्रमांक ठेवण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने मदत मिळणार आहे.

दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे जमादार वामन हिरवे हे शुक्रवारी ता. 18 कर्तव्यावर असताना रात्री सव्वा आकरा वाजता सिंदगी (ता.कळमनुरी) येथील नारायण किशन मगर याने 112 क्रमांकावर कॉल केला. यामध्ये त्याने वडिल दारु पिऊन त्रास देत असून मला मदत करा असे सांगितले. मगर याने मदतीची विनंती केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार हिरवे यांच्या पथकाने तातडीने सिंदगी येथे धाव घेतली. पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली असता किशनराव मगर हे दारुचे व्यसन करीत नाहीत शिवाय घरच्यांना त्रासही देत नसल्याचे स्पष्ट झाले.

या उलट पोलिसांशी संपर्क करणारा नारायण मगर हाच दारु पिऊन त्रास देत असल्याचे गावकऱ्यांच्या माहितीमधून स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी नारायण मगर याची चौकशी सुरु केली अता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या प्रकरणात जमादार हिरवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नारायण मगर याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार मधुकर नागरे पुढील तपास करीत आहेत

बातम्या आणखी आहेत...