आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:बीडीओसह नऊ जणांवर फसवणूक प्रकरणात औंढा पोलिसांत गुन्हा

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील नऊ गावांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांमध्ये २६ लाखांचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह नऊ जणांवर औंढा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नऊ गावांत गॅबियन बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. या कामांना तत्कालीन गटविकास अधिकारी जगदीश साहू यांनी प्रशासकीय मान्यता दिली, तर शाखा अभियंता सय्यद सलीम यांनी तांत्रिक मान्यता दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या आदेशाने जगदीश साहू, शाखा अभियंता शेख सलीम, सहायक लेखाधिकारी एल.के.कुबडे, सहायक कार्यक्रम अधिकारी गजानन कल्याणकर, तांत्रिक अधिकारी राहुल सूर्यवंशी, सुयोग जावळे, डाटा एंट्री ऑपरेटर देवराव कंठाळे आदींवर गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...