आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस विभागाने नोटिसा दिल्या आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे एकीकडे हनुमान चालीसा तर दुसरीकडे भोंगे यावरून वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवार ता. 4 महाआरती तसेच हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी तातडीने ठाणेदार यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या .
याशिवाय जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर करताना त्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हिंगोली शहरातील धडवाई हनुमान मंदिरात मनसेचे जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ता.4 सकाळी महाआरती व हनुमान चालीसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनसेचे शहर प्रमुख संतोष बांगर, संतोष खंदारे, विशाल सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष रवि मुदिराज, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष दिपक सांगळे, विठ्ठल जाधव, कृष्णा पवार, ज्ञानेश्वर वीरकर, सिध्दांत कोकाटे, संजय कोकाटे, भैय्या सोळंके, गजानन कान्हडे, राजू थिटे, आकाश धनमने, गजानन सरकटे, शुभम डोंगरदिवे, गोपाल कड, दिपक वैध, नागेश झुलझुले, सचिन पांढरे, बंडू देवडे, दशरथ धोत्रे, ऋषिकेश गादेकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह नागरीकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.