आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक:जादा तासिकांच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेत जादा तासिकाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणारा प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी मंगळवारी काढले आहे. कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथे प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार याने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने एका विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी त्यास बेदम झोडपून आखाडा बाळापुर पोलिसांच्या हवाली केले. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांनी त्यास ताब्यात घेतले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दैने यांनी शिक्षण विभागाला दिले होते. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज मुख्याध्यापक भगवान अवचार यास निलंबित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...